जे अस्पृश्यतेचे ‘सफरर’ नाहीत, मात्र ‘छद्म साक्षीदार’ आहेत, ते जातीअंताच्या लढ्याकडे आणि अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे कसे पाहतात, याचा नमुना ही कादंबरी आहे

ही कादंबरी आहे एक दीर्घकाळ नुसतीच नावाला टिकून राहिलेल्या, अवमूल्यन झालेल्या हिंदू संस्कृतीक जीवनशैलीच्या शोकात्मतेची. तिला ‘मराठीतली अभावपुजनाचा प्रघात पाडणारी कादंबरी’, असेही म्हणता येईल. छद्म अशा साक्षीदार घटकाला आपली मुळे आणि मूल्य कोसळत आहेत, हे एका बाजूला वाटते, तर त्याच वेळी जातिव्यवस्था ही रंगीबेरंगी फुलपाखरासारखी आहे, असेही वाटत राहते. हे निराधार आकलन मोठे करणारी ही कादंबरी आहे.......